Mumbai
08048047896
+919820046920

विनामूल्य संगीत उपचार कार्यशाळा डाॕ. पंडित शशांक क...

विनामूल्य संगीत उपचार कार्यशाळा डाॕ. पंडित शशांक कट्टी यांची "सुर संजीवन म्युझिक थेरपी" ही गेली २६ वर्षे काही शास्त्रीय सिद्धांत वापरून विशिष्ट विकारांवर विशिष्ट वैद्यकीय उपचारक संगीत म्हणजेच सुरावली निर्माण करत आहे. म्हणूनच म्युझिक थेरपी म्हणजे डाॕ. पं. शशांक कट्टी हे समीकरण तयार झालं आहे आणि त्यांना भारतीय संगीतोपचार पद्धतीचे जनक म्हणून मानले जाते. ते आकाशवाणीचे नॕशनल सतारवादक असून संगीत अलंकार आहेत. त्यांच्या संगीत उपचारा विषयीच्या कामाबद्दल वर्ल्ड पीस इन्स्टिट्युट आॕफ युनायटेड नेशन्सने त्यांना म्युझिक थेरपी मधे डाॕक्टरेट प्रदान केली आहे. संधीवात, ॲसिडिटी, हायपरटेंशन, मधुमेह, अस्धमा, लठ्ठपणा, अशक्तपणा, निद्रानाश, ताणतणाव, सिझोफ्रेनिया, स्मृतीभ्रंश, गुडघेदुखी, अपस्मार, पार्किन्सन, अपचन इत्यादी विकारांवर तसेच आईच्या पोटात असणाऱ्या गर्भाच्या सुयोग्य वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी प्रत्येक महिन्यात ऐकायचे आरोग्य संगीत "गर्भांकुर" यासाठी डाॕ. शशांक कट्टी यांनी गेल्या दोन तपात हजारो रुग्णांवर यशस्वी संगीतोपचार केले आहेत. "आरोग्य संगीत - मेंदू आणि संगीतोपतचार" या विषयी माहिती देणारी एक विनामूल्य सप्रयोग कार्यशाळा रविवार २१ मे २०२३ रोजी २१६/२१७ सिद्धार्थ टाॕवर्स कोथरूड येथे सायं. ५ वाजता सुर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टने आयोजित केली आहे. सर्वांनी लाभ घ्यावा. सहभाग :: डाॕ. पं. शशांक कट्टी, डाॕ. संगीता सांगवीकर. संपर्क :: ९८२००४६९२0
 2023-05-17T08:55:17

Keywords